आगामी नाटक वैश्विक आयाम देऊ शकणारं ठरू शकतं का नि त्यासाठी आपण आपला ‘शतकानुशतके चालत आलेला ‘कन्म्फर्ट झोन’ सोडू का, हा खरा प्रश्न आहे
सध्या तरी नाटक बघणाऱ्यांपेक्षा करणाऱ्यांची तीव्र निकड झालीये, असं चित्र दिसतंय. बघणारा वर्ग तसाही कायम मुंबई-पुण्यापुरता मर्यादित राहिलाय. मराठी रंगभूमीवर वेगळी ठरलेली नव्वदनंतरची नाटकं मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरांपलीकडे फार पोहोचलीच नाहीत. त्यामुळे या काळातील नाट्यलेखकांची नावं किंवा त्यांच्या कलाकृती या केवळ नाटक करणाऱ्या लोकांपलीकडे पोहोचलेल्या नाहीत.......